Sunday 2 October 2016

Lost

कुठे हरवलो कधी कळलच नाही
बालपणाच्या आठवणी सोबत ठेवत आलो
कसा जगावं ह्या विचारात वाढत गेलो...
वेळ कसा पळाला कधी कळलच नाही 
कधी सगळे वेगळे झालो कळलच नाही...
कुठे हरवलो...कधी कळलच नाही...!!!
आई वडिलांच्या स्वप्नांसाठी जगत आलो
कधी घर सोडाव लागणार असा विचार आलाच नाही...
आईच्या हातच जेवण मिळणार नाही
असा मनात आलच नाही...
मोठं व्हायच्या नादात...
कुठे हरवलो...कधी कळलच नाही...!!!
सुख मिळावं म्हणून धडपड करत आलो
कितीही कमवलं तरी कमी पडत गेलं...
मित्रता जपण्याचा प्रयत्न करत गेलो
प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवत गेलो...
कुठे हरवलो ह्याचा विचार करत गेलो...!!!
कोणी तरी आपलं मिळेल म्हणून वाट बघत गेलो
Someone special साठी surprise plan करत गेलो...
आईच प्रेम पुरेसं होत...जगण्याची हिम्मत देत गेलं...
पण...स्वप्नांसाठी कुठे हरवलो ह्याचा विचार करत आलो...
                                           
                                           -राहुल विनायक मोजाड

4 comments: